

पुणे - साडेचार वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेची शिवसेना नेत्या आणि ‘स्त्री आधार केंद्र’च्या अध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी पीडितेच्या पालकांशी दूरध्वनीवरून संवाद साधून, पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.