esakal | Lohgaon : वडगाव शिंदे- काकडे गावातील पुलाचे नामकरण .
sakal

बोलून बातमी शोधा

Lohgaon : वडगाव शिंदे- काकडे गावातील पुलाचे नामकरण

Lohgaon : वडगाव शिंदे- काकडे गावातील पुलाचे नामकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोहगाव (रामवाडी) : लोहगावच्या वडगाव शिंदे- काकडे गावातील समस्त ग्रामस्थांनी हवेली -खेड तालुक्यास जोडणारा इंद्रायणी नदीवरील पुलास कै.प्रभाकरदादा किसनराव शिंदे (आदर्श सरपंच) यांचे नाव देण्यात आले. यावेळी समस्त गावकरी उपस्थित होते.

प्रभाकरदादा शिंदे यांनी सामाजिक , राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रात अनेक कार्ये केली . ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सरपंच असा त्यांचा प्रवास सुरू झाला. या गावचे 35 वर्षे त्यांनी नेतृत्व केले . दळणवळणाची सोय व्हावी म्हणून शासनाकडून तत्कालीन आमदार निधीतून सदर पूल मंजूर करून त्याचे काम पूर्ण केले , त्यामुळे ग्रामीण भागातील जनता शहराला जोडली गेली .

वडगाव शिंदे -काकडे या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ते आयुष्यभर झटले.या गावातील समस्त ग्रामस्थांनी इंद्रायणी नदीवरील पुलास कै. प्रभाकरदादा शिंदे पूल (आदर्श सरपंच) असे नाव देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला आहे असे अनिता शिंदे यांनी सांगितले. या कार्यक्रमास वडगाव शिंदे- काकडे गावातील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

loading image
go to top