Lok Sabha Election 2024 Rohit Pawar Emotional Speech  at Baramati sharad Pawar Supriya Sule political news rak94
Lok Sabha Election 2024 Rohit Pawar Emotional Speech at Baramati sharad Pawar Supriya Sule political news rak94

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

Rohit Pawar Emotional Speech : बारामतीमधील सभेत शरद पवार यांच्याबद्दल बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
Published on

Baramati Lok Sabha Election Latest News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. या टप्प्यात संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. दरम्यान आज बारामतीच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या प्रचार सभा पार पडल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीर सभेत बोलताना पक्षाचे नेते रोहित पवार भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

रोहित पवार म्हणाले की, जेव्हा पक्ष फुटला तेव्हा मी आणि काही पदाधिकारी साहेबांसोबत बसलो होतो. साहेबांशी (शरद पवार) आम्ही चर्चा करत होतो. ते टीव्हीकडे बघत होते. त्यांनी चेहऱ्यावर दाखवलं नाही. त्यांना आम्ही काही प्रश्न विचारले त्यांनी उत्तरं दिली. बाहेर जाताना त्यांनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही अजिबात काळजी करू नका, हा आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे. तो घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढीला ताकद द्यायची आहे. जोपर्यंत नवी पिढी जबाबदारी घेण्याच्या पातळीची होत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते.

Lok Sabha Election 2024 Rohit Pawar Emotional Speech  at Baramati sharad Pawar Supriya Sule political news rak94
Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

असे म्हणताच रोहित पवारांना स्टेजवर अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळालं. डोळ्यात पाणी आलेले असताना रोहित पवार समोर बसलेल्या शरद पवारांना उद्देशून म्हणाले की, साहेब तुम्हाला विनंती करतो की हे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून पुन्हा करू नका. तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात. जे लोकं तुम्हाला त्रास देतात, ते मोठे नेते काहीही बोलले तरी सामान्य जनता आणि पवार कुटुंब तुमच्याबरोबर आहे, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

Lok Sabha Election 2024 Rohit Pawar Emotional Speech  at Baramati sharad Pawar Supriya Sule political news rak94
Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com