स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासातील दोन महान नेत्यांच्या कार्यप्रवासाचे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 एप्रिल 2018

पुणे : ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे लिखित Lokmanya to Mahatma Vol.1&2  या दोन खंडातील सकाळ प्रकाशित ग्रंथाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे सरचिटणीस आणि अभ्यासक शरद काळे  यांच्या हस्ते होत आहे.

पुणे : ज्येष्ठ लेखक व विचारवंत डॉ. सदानंद मोरे लिखित Lokmanya to Mahatma Vol.1&2  या दोन खंडातील सकाळ प्रकाशित ग्रंथाचे प्रकाशन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे सरचिटणीस आणि अभ्यासक शरद काळे  यांच्या हस्ते होत आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील या दोन महत्वाच्या नेत्यांच्या वैचारिक कार्यप्रवासावर प्रकाश टाकणाऱ्या  "लोकमान्य ते महात्मा' या पुस्तकाचा दर्जेदार इंग्रजी अनुवाद डॉ. अभय दातार यांनी केला आहे. ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ आणि विचारवंत डॉ. रामचंद्र गुहा यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.  कार्यक्रमात  प्रस्तावनेच्या मराठी अनुवादाचे अभिवाचन निवेदक श्री. राजेंद्र हुंजे करतील.  

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळातील महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा लेखाजोखा मांडणारा हा ग्रंथ राजकीय, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत उपयुक्‍त संदर्भग्रंथ आहे. पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये तत्कालीन राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीविषयी श्री.  सदा डुंबरे (लोकमान्य ते महात्मा' : इतिहासलेखनाचा वेगळा बाज), डॉ. सदानंद मोरे (लोकमान्य ते महात्मा' या लेखनामागील प्रेरणा, लेखनप्रवासातील ठळक टप्पे आणि विवेचन), डॉ. अभय दातार ("लोकमान्य ते महात्मा' पुस्तकाचा इंग्लिश अनुवाद करताना जाणवलेले विशेष),  श्री. शरद काळे (यशवंतराव प्रतिष्ठान आणि Lokmanya To Mahatma हा प्रकल्प) आणि  श्री. प्रतापराव पवार अशा दिग्गजांचे विचारभाष्य ऐकण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे.   महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 'गर्जा महाराष्ट्र' या डॉ. सदानंद मोरे यांच्याच पुस्तकातील पोवाड्याचे सादरीकरण ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे करणार आहेत. 

कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे :
दिनांक व वेळ : १ मे, २०१८, सकाळी ११ वाजता
स्थळ -  यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे. 
 
पुस्तकाचे लेखक डॉ. सदानंद मोरे यांच्याविषयी थोडेसे... 
* संत साहित्याचे अभ्यासक, भाष्यकार व तत्त्वचिंतक 
* ग्रंथलेखनासाठी साहित्य अकादमीसह विविध मानाचे पुरस्कार 
* साहित्य अकादमी, साहित्य संस्कृती मंडळ, भाषासल्लागार  समिती अशा अनेक संस्थांचे पदाधिकारी 
* 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lokmanya To Mahatma book by Sadanand More