Pune Lokmanya Nagar Redevelopment : लोकमान्यनगर परिसरात स्वाक्षरी मोहीम; इमारतींच्या पुनर्विकासाबाबत स्थानिक आमदारांच्या भूमिकेच्या विरोधात आंदोलन
Pune Building Redevelopment : लोकमान्यनगर पुनर्विकास स्थगितीच्या विरोधात नागरिकांनी एकत्र येत स्वाक्षरी मोहीम राबवली असून, ८०३ कुटुंबांचे स्वप्न पुन्हा धूसर झाल्याने संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
पुणे : लोकमान्यनगर परिसरातील इमारतींच्या पुनर्विकासाबाबत स्थानिक आमदारांच्या भूमिकेच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. याचा एक भाग म्हणून लोकमान्यनगर परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.