Loksabha 2019 : पुण्यातून 31 तर, बारामतीमधून 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

पुणे  : पुणे लोकसभा मतदारसंघातून 12 इच्छुकांनी अर्ज माघार घेतल्यामुळे आता 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, बारामती लोकसभा मतदारसंघातून सातजणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर 18 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार (ता. 8) होती.

पुणे  : पुणे लोकसभा मतदारसंघातून 12 इच्छुकांनी अर्ज माघार घेतल्यामुळे आता 31 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, बारामती लोकसभा मतदारसंघातून सातजणांनी अर्ज मागे घेतल्यानंतर 18 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार (ता. 8) होती.

पुणे लोकसभा मतदारसंघातून एकूण 46 उमेदवारांनी 59 अर्ज दाखल केले होते. छाननीत तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविले होते. त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 12 जणांनी माघार घेतली. त्यात दयानंद अडागळे, आजम मनियार, गोरख घोडके, अजय पैठणकर, राजेश खडके, राहुल डंबाळे, अल्ताफ करीम शेख, शब्बीर तांबोळी, इम्रान शेख, अशोक बोईनवाड, भरत जैन, अ. सईद अराकाटी यांचा समावेश आहे. भाजप-शिवसेना युतीचे गिरीश बापट, कॉंग्रेस-राष्ट्रवादीकॉंग्रेस आघाडीचे मोहन जोशी, वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव, बहुजन समाज पक्षाचे उत्तम शिंदे यांच्यासह 31 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघ-
बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 31 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी रंजना कुल यांच्यासह सहा जणांचे अर्ज बाद ठरले होते. त्यानंतर 25 उमेदवारांपैकी नानासाहेब चव्हाण, गणेश जगताप, सागर  कोंडेकर, प्रल्हाद महाडिक, चांगदेव कारंडे, शंकर तामकर आणि उमेश म्हेत्रे या सात जणांनी माघार घेतली.

बारामतीमधून आता राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीच्या सुप्रिया सुळे, भाजप-शिवसेना युतीच्या कांचन कुल, वंचित बहुजन आघाडीचे नवनाथ पडळकर, बहुजन समाज पक्षाचे मंगेश वनशिव यांच्यासह 18 उमेदवार निवडणुकीच्या
रिंगणात आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 : 31 candidates In Pune,18 candidates from Baramati are in the Election fray