esakal | Loksabha 2019 : ‘संकल्पपत्र’ अन्‌ ‘विकासनामा’
sakal

बोलून बातमी शोधा

Girish-and-Mohan

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

Loksabha 2019 : ‘संकल्पपत्र’ अन्‌ ‘विकासनामा’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसने पुण्याच्या विकासाची भूमिका मांडली आहे. भाजपने त्याला ‘संकल्पपत्र’ म्हटले आहे तर, काँग्रेसने ‘विकासनामा पुण्याचा’. या निवडणुकीत कोणाचाही उमेदवार विजयी होवो; परंतु मतदारांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे.

गिरीश बापट - संकल्पपत्र 

 • स्मार्ट सिटीचे प्रकल्प वेगाने पूर्ण करणार 
 • पुरंदर विमानतळाची निर्मिती वेळेत करणार 
 • शहर आणि परिसरात मेट्रोचे जाळे निर्माण करणार 
 • पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि हडपसर रेल्वे स्थानकांचा विकास करणार 
 • समान पाणीपुरवठा प्रकल्प वेळेत पूर्ण करणार 
 • नदीसुधार प्रकल्प राबविणार 
 • ससूनचे विस्तारीकरण करून बिबवेवाडीत सुसज्ज रुग्णालय उभारणार 
 • शहरातील कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्पांचा प्रश्‍न सोडविणार 
 • सर्वांसाठी घरे योजनेचे प्रभावी अंमलबजावणी करणार 
 • महिला, युवकांसाठी कल्याणकारी योजना राबविणार

मोहन जोशी - संकल्पपत्र

 • विकासनामा  
 • पुणे गतिमान करणार, वाहतुकीच्या प्रकल्पांना प्राधान्य देणार 
 • एकही बस रस्त्यावर पार्क होऊ नये म्हणून डेपो विकसित होणार 
 • रस्त्यांवरील छेडछाडीला अटकाव करणार 
 • कचरा व्यवस्थापन प्रभावी करून प्रदूषणमुक्त शहर करणार
 • कला- संस्कृतीच्या माध्यमातून शहरात आनंदीमय वातारण निर्माण करणार
 • शिक्षण हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करणार 
 • पुण्यात ‘आयआयटी’ आणि ‘आयआयएम’साठी पाठपुरावा करणार 
 • उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात आणणार 
 • शासकीय रुग्णालयांचे खासगीकरण नाही 
 • खासगी बस आणि मालवाहू वाहनांसाठी शहराबाहेर जागा विकसित करणार 

वाहतुकीवर भर 
शहरातील गंभीर प्रश्‍न वाहतुकीचा असल्याचे वारंवार अधोरेखित झाले आहे. भाजप आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातही त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. दोन्ही जाहीरनाम्यांचा भर वाहतुकीची समस्या सोडविण्यावर आहे.

पुणेकरांच्या जाहीरनाम्याची दखल 
‘सकाळ’ने नागरिक, तज्ज्ञांच्या मदतीने तयार केलेल्या ‘पुणेकरांच्या जाहीरनाम्यातील’ बहुतांश सूचना दोन्ही राजकीय पक्षांनी आपआपल्या संकल्पपत्र आणि विकासनाम्यात समाविष्ट केल्याचे दिसून आले आहे.

loading image
go to top