Loksabha Election 2024 : पश्‍चिम महाराष्ट्रात शक्ती वाढविण्यासाठी काँग्रेस करणार पुण्यात मंथन

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांची महाविकास आघाडी आहे.
congress
congresssakal

पुणे - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसतर्फे संघटनात्मक बांधणी व त्याचा आढावा घेण्यास सुरवात झाली आहे. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या पश्‍चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त आमदार व खासदार निवडून आणण्यासाठी पुण्यात ८ आॅक्टोबर काँग्रेसचे नेते मंडळी मंथन करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह प्रदेश पातळीवरील पदाधिकारी, आमदार यावेळी उपस्थित असणार आहेत.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांची महाविकास आघाडी आहे. तर राष्ट्रीय पातळीवर ‘इंडिया’ आघाडी स्थापन करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या जागा हे तिन्ही पक्ष एकत्र लढविणार असले तरी प्रत्येक पक्षाने आपापल्या स्तरावर आढावा घेणे सुरु केले आहे.

ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला होता. पण या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्याने त्याचे गणित बिघडलेले आहे. तर काँग्रेसला खिंडार न पडल्याने हा पक्ष मजबूत आहे. अशा स्थितीत आगामी निवडणुकांमध्ये खासदार, आमदारांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

१० आमदार, शून्य खासदार

पुण्यातील काँग्रेस भवनात पुणे शहर, ग्रामीण, पिंपरी चिंचवडसह सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांची बैठक होणार आहे. या पाच जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण ७० जागा आहेत. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने यापैकी २९ जागा लढविल्या होत्या, त्यातील ९ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते.

तर काही महिन्यांपूर्वी झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाल्याने काँग्रेसची आणखी एक जागा वाढून आमदारांची संख्या १० वर गेली आहे. यामध्ये पुण्यात ३, कोल्हापूरमध्ये ४ आणि सोलापूर, सातारा आणि सांगलीमध्ये प्रत्येकी एक आमदार आहे. तर ११ लोकसभेच्या जागा असल्या तरी एकही खासदार नाही.

congress
Pune : पिंपरखेड येथे 'भीमाशंकर'च्या बाजारभावाचे स्वागत ; एकमेकांना पेढे भरवून केला आनंद व्यक्त

‘‘आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसची पश्‍चिम महाराष्ट्राची विभागीय बैठक पुण्यात ८ आॅक्टोबर रोजी होणार आहे. यामध्ये ब्लॉक अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, महिला आघाडी, एनएसयुआय, युवक काँग्रेस यासह इतर महत्त्वाच्या आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा आढावा घेतला जाईल. या मतदारसंघातील महत्त्वाचे पदाधिकारी, आमदार यांच्याशी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चर्चा करणार आहेत. पुण्यात प्रथमच विभागीय बैठक होत आहे.’’

अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस

congress
Nanded Hospital News : भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाला किंमत नाही; राहुल गांधींची भाजपवर टीका!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com