Murlidhar Mohol : गडकिल्ल्यांचे संवर्धन करणार

सकल हिंदू समाजाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात हिंदू जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते.
Murlidhar Mohol
Murlidhar Moholsakal

पुणे - ‘हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. तसेच राज्यातील गडकोट आणि दुर्गांच्या संवर्धनाचे काम कर्तव्य भावनेतून करणार आहे’, अशी ग्वाही महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

सकल हिंदू समाजाच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरात हिंदू जनसंवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. यात २७ हिंदुत्ववादी संघटनांनी मोहोळ यांना पाठिंबा दिला. यात मोहोळ बोलत होते. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकर गायकर यांनी श्रीराम मंदिराचा संघर्ष मांडला.

मोहोळ म्हणाले, ‘युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून शिवाजी महाराजांच्या काळातील १२ किल्ल्यांचे नामांकन पाठविले आहे. रायगडासह साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा त्यात समावेश आहे. २०२४-२५ या वर्षासाठी केंद्र सरकारने मराठा लष्करी भूदृश्ये असा प्रस्ताव युनेस्कोकडे दिला आहे.’

या मेळाव्यात किशोर चव्हाण, पराग ठाकूर, दीपक नागपुरे, स्वप्नील नाईक, लोकेश कोंढरे, संजय भोसले, किशोर येनपुरे, श्रीकांत शिळीमकर, अनिकेत हरपुडे यांनी मोहोळ यांना पाठिंबा जाहीर करून मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन महेश पवळे यांनी केले.

सामरिक लष्करी शक्तीचे दर्शन

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील बहुतांश किल्ले सह्याद्रीच्या परिसरातील आहेत. सतराव्या ते एकोणिसाव्या शतकादरम्यान बांधलेल्या या किल्ल्यांच्या माध्यमातून मराठा राजवटीच्या सामरिक लष्करी शक्तीचे दर्शन होते. या आणि अशा अनेक किल्ल्यांच्या मदतीने शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या किल्ल्यांचे जतन, संवर्धनाचे काम मी कर्तव्य भावनेतून करेन, अशी ग्वाही मोहोळ यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com