Lonavala Cab Driver Assault Case
esakal
लोणावळ्यात कॅब चालकांना मारहाण करत त्याच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. शनिवारी हा संपूर्ण प्रकार घडला होता. या घटनेचा एक व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी आता लोणावळा पोलिसांनी कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.