
लोणावळा : गवळीवाडा मुख्य टपाल कार्यालयाच्या इमारतीची अतिशय दुरवस्था झाली असून कधीही स्लॅब कोसळून अपघात होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन कर्मचारी अक्षरशः धोका पत्करून काम करत आहेत. याच कार्यालयात स्वतंत्र वितरण केंद्र (आयडीसी) केंद्रही प्रस्तावित आहे. मात्र, इमारतीचा दर्जा व्यवस्थित नसल्याने कामाचा दर्जा सुधारणार कसा ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.