

Lonavala Crowded During Long Weekend Tourists Flock To Bhushi Dam And Lions Point Traffic Jams Hit Pune Mumbai Highway
sakal
लोणावळा : स्वातंत्र्यदिन आणि त्याला जोडून आलेल्या शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांचा अक्षरशः महापूर आला आहे. धुक्याची चादर, हिरवेगार डोंगर आणि कोसळणाऱ्या धबधब्यांच्या साक्षीने वर्षाविहाराचा आनंद लुटण्यासाठी मुंबई, पुण्यासह राज्यभरातून हजारो पर्यटक लोणावळ्याकडे दाखल झाले असून, मावळातील प्रमुख पर्यटनस्थळे गजबजली आहेत.