
Lonavala Skywalk
Sakal
लोणावळा : लोणावळ्याजवळील कुरवंडे गावात उभारण्यात येणाऱ्या टायगर पॉइंट येथील स्काय वॉक प्रकल्पाबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या वेळी अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. या प्रकल्पासाठी पाच फेब्रुवारी २०२४ रोजी ३३३ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. हा प्रकल्प मावळ तालुक्याच्या पर्यटन विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.