

Street Vendors Protest Against Proposed Anti Encroachment Action in Lonavala
esakal
लोणावळा : टपरी, पथारी आणि हातगाडीधारकांनी हक्कांसाठी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय ठिय्या आंदोलन केले. नगर परिषदेच्या प्रस्तावित अतिक्रमणविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित आंदोलनाला काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने पाठिंबा देत सहभाग नोंदविला.