लोकाभिमुख प्रशासन, पर्यटन सुविधा देणार

लोकाभिमुख प्रशासन, पर्यटन सुविधा देणार

Published on

लोणावळा, ता. ३१ : लोकाभिमुख प्रशासन, पर्यटन सुविधा आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देणार आहे, असे ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केला.
लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र सोनवणे यांनी पदभार स्वीकारला. या पार्श्वभूमीवर सोनवणे यांनी त्यांच्या आगामी कार्यकाळाची दिशा स्पष्ट केली.

पर्यटन विकासासह स्थानिकांचा लाभ
लोणावळा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर उभे राहत असताना स्थानिक नागरिकांनाही त्याचा थेट फायदा व्हावा तसेच ‘पर्यटन विकास करताना पर्यावरण संरक्षण व्हावे असे स्पष्ट करत त्यांनी रोप वे, अम्युझजमेंट पार्क, सुरक्षित धबधबा क्षेत्रे, उद्याने, येथील तलावक्षेत्रांमध्ये पर्यटनाच्या सुविधा आणि स्थानिक व्यवसायांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना राबविण्याचे संकेत दिले.

भविष्यातील चित्र
पुढील पाच वर्षांत लोणावळा स्वच्छ, सुरक्षित, पर्यावरणपूरक आणि रोजगारसंधी निर्माण करणारे शहर म्हणून उभे राहावे, हेच आपले स्वप्न असल्याचे राजेंद्र सोनवणे यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अत्याधुनिक क्रीडा संकुल, भाजी मंडईचे विस्तारीकरण व वाहनतळाची सुविधा याठिकाणी निर्माण करणार. प्रलंबित भांगरवाडी-नांगरगाव रेल्वे उड्डाणपूल मार्गी लावणे तसेच बंद होत असलेल्या रेल्वे फाटकपरीसरात पादचारी पूल उभारणीसाठी प्रस्ताव करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाणीपुरवठा सुरळीत करणार
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था बळकट करणे, गळती थांबवणे आणि नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करणे, हे त्यांच्या ‘अजेंड्या’त अग्रक्रमावर आहे. ‘‘स्वच्छ लोणावळा ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात दिसली पाहिजे,’’ असे सांगत त्यांनी कचरा वर्गीकरण, ओला-सुका कचरा व्यवस्थापन आणि आधुनिक स्वच्छता यंत्रणा उभारण्यावर भर दिला. लोणावळ्यातील वाहतूक व्यवस्था आणि कोंडीमुळे बिकट प्रश्न उभा राहिला आहे. पार्किंग नियोजन आणि पोलिस-प्रशासन यांचा समन्वय साधण्याचे नियोजन आहे. त्यांच्या या व्हिजनकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून,या अपेक्षांना प्रत्यक्षात उतरवण्याचे आव्हान त्यांच्या समोर आहे.

LON25B05052 (राजेंद्र सोनवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com