
लोणावळा : सध्या स्वातंत्र्य दिनास पर्यटनाचा ‘ट्रेंड’ वाढत असताना यंदा लोणावळा-खंडाळ्यास थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. हॉटेल्स व रिसॉर्टचे बुकिंग पन्नास ते साठ टक्क्यांच्या आसपास असून वीकेंडला स्वातंत्र्य दिनास पतेती, जन्माष्टमी जोडून आली आहे. सलग सुट्ट्यांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी होण्याची आशा व्यावसायिक बाळगून आहेत.