london robot in vadgaon sheri
sakal
वडगाव शेरी - पुणे महानगरपालिकेने बेकायदा नळजोड आणि पाण्याची गळती शोधण्यासाठी लंडन येथून आणलेल्या एका रोबोटने आज वडगाव शेरीत कमाल केली. गणेश नगर येथील पाचशे मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीत तब्बल 300 मीटर आत जाऊन या रोबोटने बेकायदा 40 नळ जोड शोधून काढले. असे बेकायदा नळ जोड शोधण्यासाठी पहिल्यांदाच रोबोट तंत्रज्ञानाचा वापर वडगाव शेरीत करण्यात आला.