Loni Kalbhor News : लोणी काळभोर गॅस गळती स्फोटात जखमी झालेल्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू!

Loni Kalbhor Gas Blast : लोणी काळभोर येथील नेहरू चौकाजवळील इमारतीत गॅस गळती होऊन स्फोट झाल्याच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या करूणा मनोज जगताप यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, घराचे मोठे नुकसान झाले होते, तर एका दुचाकीस्वारालाही दुखापत झाली होती.
Tragic Death Follows Gas Leak Blast in Loni Kalbhor

Tragic Death Follows Gas Leak Blast in Loni Kalbhor

sakal

Updated on

सुनील जगताप

थेऊर : सोमवार (१ डिसेंबर) रोजी येथील नेहरू चौकाजवळ असलेल्या जगताप हाईट्स इमारतीत सिलेंडरमधून गॅस गळती होऊन अचानक स्फोट झाल्याची घटना घडली होती. यामध्ये घरांतील महिला भाजून गंभीर जखमी झाली होती.तिचा शनिवार (६ डिसेंबर) रोजी उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. या घटनेमध्ये करूणा मनोज जगताप (वय ४१ रा. जगताप साईट्स, नेहरू चौक, लोणी काळभोर) या मृत्यूमुखी पडल्या आहेत. करुणा जगताप या जगताप हाईट्स मध्ये पहिल्या मजल्यावर आपले पती व दोन मुलांसह रहात होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com