

Loni Kalbhor Gram Panchayat Announces 50% Discount on Property Tax Arrears
Sakal
सुनील जगताप
थेऊर : मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान - २०२५ अंतर्गत ग्रामपंचायत लोणी काळभोर यांचे वतीने १ एप्रिल २०२५ पूर्वीची निवासी मालमत्ता कर थकबाकी व चालू बाकी ३१ डिसेंबर २०२५ अखेर एक रकमी भरल्यास थकबाकी वर ५० टक्के सवलत मिळणार असल्याची माहिती सरपंच नागेश काळभोर व ग्रामसेवक एस. एन. गवारी यांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान - २०२५' अंतर्गत ग्रामपंचायतींना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रोत्साहन दिले जाते, ज्यामध्ये करसवलत हा एक महत्त्वाचा भाग आहे.