

Pune Crime Branch Unit-6 team seized nearly 8 grams of MD during a midnight patrol.
Sakal
सुनील जगताप
थेऊर : लोणी काळभोर येथे गुन्हे शाखा,पुणे शहर पोलीस पथकाने येथील पाषाणकर बाग परिसरात एकास ताब्यात घेऊन त्याचेकडून सुमारे १ लाख ८० हजार ९२० रुपये किंमतीचा ७ ग्रॅम ९९ मिलीग्रॅम (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार याप्रकरणी अफसर अहेसान अंन्सारी (वय ३१, रा.पाषाणकर बाग,गॅस एजन्सी शेजारी लोणी काळभोर,ता हवेली,जि पुणे)याला १९ नोव्हेंबर रोजी १.३५ वाजण्याच्या सुमारास पाषाणकर बाग,काळभोर हाईटस,समोर असलेल्या सार्वजनिक ठिकाणी रोडवर जेरबंद करण्यात आले आहे.