

Loni Kalbhor police detain habitual offender Saddam Ansari under MPDA Act
Sakal
सुनील जगताप
थेऊर : पोलीसांकडुन करण्यात आलेल्या प्रतिबंधक कारवाईस न जुमानता सातत्याने राजरोसपणे गुन्हेगारी कृत्य करीत असलेला सराईत गुन्हेगार सद्दाम अन्सारी यास लोणी काळभोर पोलीसांनी १ वर्षाकरीता स्थानबध्द केले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,लोकांमध्ये दहशत करणारे सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवुन त्यांचे विरुध्द ठोस व परिणामकारक कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करणेबाबतचे आदेश देण्यात आलेले होते.