

Pune Rural Police Bust Ganja Racket, Arrest One with Illegal Narcotics in Loni
esakal
लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी रेल्वे स्टेशन परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी धडक कारवाई करत ६०८ ग्रॅम गांजासह एका तस्कराला जेरबंद केले आहे. मंगळवारी (ता. ३०) रोजी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारांस करण्यात आलेल्या या कारवाईत ३६ हजार रुपयांचा गांजा आणि ५ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.