
शासकीय पदे भविष्यात कमी होत जाणार आहेत. केवळ २.७ टक्के सरकारी नोकऱ्या राहिल्या आहेत. तर खासगी क्षेत्रात ९५ टक्के नोकऱ्या आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांकडे प्लॅन ‘बी’ म्हणून बघा,
स्पर्धा परीक्षांकडे प्लॅन ‘बी’ म्हणून बघा - महेश झगडे
पुणे - शासकीय पदे (Government Post) भविष्यात कमी होत जाणार आहेत. केवळ २.७ टक्के सरकारी नोकऱ्या (Government Job) राहिल्या आहेत. तर खासगी क्षेत्रात ९५ टक्के नोकऱ्या (Jobs) आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षांकडे (Competition Exam) प्लॅन ‘बी’ (Plan-B) म्हणून बघा, असा सल्ला माजी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे (Mahesh Jhagade) यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा संयुक्त विद्यामाने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा : वास्तव, भवितव्य आणि दिशा’ या विषयावर ‘संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी झगडे बोलत होते. राज्यात किती पदे रिक्त आहेत, याची माहितीच नाही. त्यामुळे भरती प्रक्रिया राबवण्यास अडचण येते. राज्यातील सर्व खात्यांना रिक्त पदांचा आढावा घेण्यास सांगावे. आणि एक वर्ष आधीच रिक्त पदांची माहिती जमा करावी.
जे अधिकारी ही माहिती सादर करणार नाहीत. त्यांचे कान टोचावेत. तसेच असलेली रिक्त पदे भरावीत अथवा ती थेट रद्द करावीत, अशी मागणी झगडे यांनी भरणे यांच्याकडे केली. सध्या आरोग्य विभागांसह इतर विभागांच्या परीक्षांचा गोंधळ पाहता, सर्व प्रकारच्या परीक्षा एमपीएससीकडे द्याव्यात.
खासगी कंपन्यांना पैसे देण्याऐवजी एमपीएससीची कार्यक्षमता वाढविण्यात येऊन जिल्हास्तरावर उपकेंद्रे सुरु करावीत. त्यामुळे भरती प्रक्रियेला कायमस्वरूपी मदत होईल, असा सल्ला झगडे यांनी सरकारला उद्देशून भरणे यांना दिला. तसेच यासाठी कोणत्याही मानधनाशिवाय सल्लागार म्हणून काम करण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Web Title: Look At The Competition Exams As Plan B Mahesh Jhagde
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..