esakal | शेततळ्याचा कागद कापल्याने भावडीत शेतकऱ्याचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

शेततळ्याचा कागद कापल्याने भावडीत शेतकऱ्याचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातगाव पठार : भावडी, (ता.आंबेगाव) येथील नलिनी शिवाजी नवले यांच्या शेतात असलेल्या शेततळ्याचा कागद गुरुवारी (ता. ९) रात्री अज्ञात व्यक्तीने कापला तसेच मोटारीची दोरी देखील या अज्ञात व्यक्तीने कापली असल्याने मोठे नुकसान झाले आहे. कागद कापल्याने शेततळ्यातील पाणीसाठा सुमारे ६ ते ७ फुटांनी कमी झाल आहे.

हेही वाचा: लष्कराची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली; टपाल कर्मचाऱ्याला अटक

भावडी येथे नलिनी नवले यांनी त्यांच्या शेतामध्ये शेततळे बांधले आहे. यंदाच्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे शेततळे पूर्ण भरलेले नाही. त्यातच गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने शेततळ्यातील कागद कापला. त्यामुळे कागदाला मोठे छिद्र पडले असल्याने पाणीसाठा ६ ते ७ फुटांनी घटला आहे. त्यामुळे नवले यांचे मोठे नुकसान झाले आहे. कुणीतरी जाणून बुजून आकसापोटी, हे कृत्य केले असावे, अशी शंका सरपंच महेश नवले यांनी यावेळी बोलून दाखविली. याबाबत सदर प्रकरणाची मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती नलिनी नवले यांनी दिली.

loading image
go to top