esakal | भारतीय लष्कराची गुप्त माहिती पुरवली; पाकिस्तानी एजंट महिलेस अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Army-Tank

लष्कराची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली; टपाल कर्मचाऱ्याला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : टपालाद्वारे पाठविण्यात येणारी लष्कराशी संबंधित गुप्त माहिती चोरुन पाकिस्तानी महिला एजंटला पाठविणाऱ्या रेल्वेच्या टपाल सेवेतील कर्मचाऱ्यास दक्षिण मुख्यालयाच्या लष्करी गुप्तचर विभागाचे पुणे युनिटचे पथक व राजस्थान पोलिसांनी अटक केली. राजस्थानमधील जयपूर रेल्वे टपाल विभागामध्ये ही कारवाई गुरुवारी करण्यात आली.

हेही वाचा: अत्याचारांच्या घटनांनी हादरलं पुणं;पाहा व्हिडिओ

भरत बावरी (वय 27, रा. खेडवा, जोधपूर, राजस्थान) असे राजस्थान पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. लष्करी गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराद्वारे दररोज टपाल सेवेद्वारे विविध युनिट आणि आस्थापनांना अधिकृत पत्रे पाठविण्यात येतात. तसेच या पत्रांना उघडण्याची परवानगी कोणालाही नसते. सर्व पत्र लष्कराच्या टपाल विभागात जातात. दरम्यान, बावरी हा राजस्थानमधील जयपूर येथील रेल्वे टपाल विभागातील मल्टी टास्कींग स्टाफ’ (एमटीएस ) कर्मचारी होता. त्याच्याकडे लष्कराशी संबंधित टपालाचे वर्गीकरण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

हेही वाचा: पुणे : खाणीत होणार शास्त्रीय पद्धतीने मूर्ती विसर्जन

तेथे तो रात्रपाळीत काम करताना लष्कराशी संबंधित पत्रव्यवहारांचे मोबाईलवर छायाचित्रे काढून ‘आयएसआय’ या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेशी संबंधित पाकिस्तानी महिला एजंटला पाठवीत होता. मागील काही महिन्यांपासून तो हे काम करत आहे. ही बाब लष्करी गुप्तचर विभागाच्या निदर्शनास आली होती. त्यानुसार, त्यांच्याकडून बावरीवर लक्ष ठेवण्यात येत होते. त्यानंतर त्यास लष्करी गुप्तचर विभागाने राजस्थान पोलिसांच्या मदतीने अटक केली. त्याच्याविरुद्ध शासकीय गुप्त माहिती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याची केंद्रीय व राज्यातील तपास संस्थांकडून संयुक्तपणे चौकशी केली जात आहे.

हेही वाचा: दौंड : मेडीकलमध्ये चोरी, १ लाख ४५ हजार रूपयांची रोकड लंपास

..आणि ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला बावरी !

बावरीची काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानी महिला एजंटसमवेत समाजमाध्यमांद्वारे ओळख झाली. त्यावेळी तिने आपण ‘महिला नर्सिंग सहाय्यक’ असून सध्या अंदमान व निकोबार येथील पोर्ट ब्लेअर येथे कार्यरत असल्याचे बावरीला सांगितले. त्यामुळे बावरीने तिच्यावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर व्हॉटसअप चॅटिंग, व्हिडिओ कॉलींगद्वारे तिने बावरीभोवती "हनी ट्रॅप'चे जाळे टाकण्यास सुरवात केली. दरम्यान, तिने आपण जयपूर येथे येऊन प्रत्यक्षात भेट घेऊन एकत्र फिरण्याचे व राहू असे सांगत आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिने तिच्या लष्करात कार्यरत एका नातेवाईकास दुसऱ्या युनिटमध्ये पाठविण्यासाठी आवश्‍यक लष्कराशी संबंधित पत्रांची माहिती पाठविण्यास सांगितली. त्यानुसार, त्यानेही तिला मोबाईलवर पत्रांची छायाचित्रे पाठविण्यास सुरवात केली.

हेही वाचा: दौंड : उप अधीक्षकांना बदलीची धमकी देणार्यास अटक

संबंधित प्रकरणात तांत्रिक विश्‍लेषण करत असताना रेल्वे टपाल खात्यातील कर्मचाऱ्याचे नाव समोर आले होते. त्यानंतर आम्ही त्याच्यावर नजर ठेवली आणि त्याचा पाकिस्तानी महिला एजंटशी संबंध असल्याचे आमच्या निदर्शनास आले. तसेच त्याच्या मोबाईलमधून काही पत्रांचे छायाचित्रेही जप्त केले आहेत. तसेच पाकिस्तानी महिला ही "आयएसआय' एजंट असून त्याबाबतचे पुरावे देखील आम्हाला मिळाले आहेत. दरम्यान या प्रकरणाचा आम्ही सखोल तपास करीत आहोत.’’ असे लष्करी सूत्रांनी सांगितले.

loading image
go to top