बापरे, १५ दिवसांमध्ये फेकली २० टन फुले

नवनाथ भेके
Monday, 14 September 2020

सध्या पदरमोड मजूरी घालवून फुले तोडून फेकून दयावी लागत असल्याने लाखोंचा फटका बसल्याचे सांगत आहे आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावातील युवा शेतकरी तुषार वाघ...

निरगुडसर : सव्वा एकरासाठी १ लाखाहुन अधिक खर्च करुन झेंडुचे पिक घेतले. मोठया कष्टाने वाढवले. परंतू ऐन फुले तोडणीला बाजारभाव कोसळले आणि फुले फेकून देण्याची वेळ आली. सध्या पदरमोड मजूरी घालवून फुले तोडून फेकून दयावी लागत असल्याने लाखोंचा फटका बसल्याचे सांगत आहे आंबेगाव तालुक्यातील रांजणी गावातील युवा शेतकरी तुषार वाघ..

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​

ज्या झेंडुच्या फुलशेतीने शेतक-यांना मागील महीन्यात लखपती बनवले त्याच झेंडुतुन केलेला खर्चही वसुल होत नसल्याची परिस्थिती सध्या आहे गेल्या १५ दिवसापासुन झेंडुचे दर कोसळल्यामुळे शेतक-यांना फुले फेकुन देण्याची वेळ आली आहे त्यामुळे लाखो रुपयांचा फटका बसला आहे.रांजणी व नागापुर या दोन गावातील १० शेतक-यांनी गेल्या १५ दिवसात २० टन फुले फेकुन दिली आहे.

आंबेगाव तालुक्यातील नागापुर, रांजणी, जाधववाडी, वळती, शिंगवे आदी परीसरात मोठया प्रमाणात झेंडूच्या फुलशेतीचे पीक घेतले. ज्या शेतक-यांची तोडणी श्रावण व गणपती उत्सवात सुरु होती ते शेतकरी लखपती झाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यामध्ये वळती (ता. आंबेगाव) येथील धोंडीभाऊ भोर यांचा समावेश आहे. त्यांना आपल्या आठ एकर झेंडूतुन तब्बल ६२ लाख रुपयांचा नफा मिळाला. परंतू त्यानंतर सुरु झालेला पाऊस व गणेशोत्सव संपल्यामुळे फुलांचे दर कोसळले. जे व्यापारी फुले खरेदीसाठी शेताच्या बांधावर यायचे तेच व्यापारी फुलाकडे पाहतही नव्हते.

शेतक-यांनी मशागत, मल्चिंग, ठिबक, रोपे, खते, औषधे, मजुरी आदींसाठी पण या ८० ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च केला आहे. परंतु सध्या फुले बाजाराअभावी फेकून देण्याची वेळ आली आहे. नागापुर व रांजणी येथील १० तरुण शेतक-यांनी यंदा झेंडूचे पीक घेतले खरे परंतु बाजारभाव मिळत नसल्याने त्यांना फुले पदरमोड मजुरी घालुन तोडुन आपल्याच शेतात फेकुन दयावी लागत आहेत. त्यामुळे या १० शेतक-यांना जवळपास ८ ते १० लाख रुपयांचा फटका बसला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रांजणी (ता. आंबेगाव) येथील युवा शेतकरी तुषार वाघ म्हणाले की, मी सव्वा एकर क्षेत्रावर झेंडूचे पीक घेतले असून, सव्वा एकरासाठी १ लाखाहून अधिक खर्च केला आहे सध्या बाजारभाव नसल्याने मी गेल्या १५ दिवसात ४ टन फुले फेकून दिली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of farmer due to low market price of flowers