...अन् फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले अश्रू

डी. के. वळसे पाटील
Tuesday, 15 September 2020

फुलांचे गाव असा नावलौकिक तांबडेमळा गावचा आहे. येथे पावसाळ्यात फुलझाडांची लागवड करण्याची परंपरा आहे. येथे सर्वच कुटुंब अल्पभूधारक असून जमिनीचे क्षेत्र कमी आहे. सध्यस्थितीत बाजार भावाच्या चढ-उतारामुळे फुल पिकाची लागवड क्षेत्रही घटले आहे.

मंचर : गणेशोत्सवात झेंडू पिकला प्रती किलोला १८० ते २०० रुपये बाजारभाव मिळाला होता.एकदा तर उच्चांकी  ५०० रुपये प्रती किलोला बाजारभाव मिळाला होता. सध्या मात्र पाच रुपये किलोही बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत नाही. सध्यातर अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन असल्यामुळ फुले विक्रेत्यांची दुकाने बंद आहेत. व्यापाऱ्यांनी खरेदीच बंद केली आहे. त्यामुळे माझ्यासह  अनेक शेतकऱ्यांनी फुलांची झाडे काढण्सयास सुरुवात केली आहे. फुल उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत, अशी व्यथा तांबडेमळा-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शेतकरी छाया सचिन भोर यांनी अश्रू आवरत आपली व्य़था मांडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फुलांचे गाव असा नावलौकिक तांबडेमळा गावचा आहे. येथे पावसाळ्यात फुलझाडांची लागवड करण्याची परंपरा आहे. येथे सर्वच कुटुंब अल्पभूधारक असून जमिनीचे क्षेत्र कमी आहे. सध्यस्थितीत बाजार भावाच्या चढ-उतारामुळे फुल पिकाची लागवड क्षेत्रही घटले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गावडेवाडी, चांडोली बुद्रुक, चांडोली खुर्द, श्रीक्षेत्र वडगाव काशिंबेग, लांडेवाडी, नांदूर, सुलतानपूर ,एकलहरे, वळती, आदी 30 गावांतील शेतकरी प्रामुख्याने गणेशोत्सव ते दसरा या कालावधीत फुलांची तोडणी होईल. अशा पद्धतीने जूनमध्ये फुल पीकाची लागवड करतात. सध्याच्या लॉकडाउनचा मोठा फटका फुल उत्पादकांना बसला आहे, असे तांबडेमळाचे सरपंच ज्ञानेश्वर भोर यांनी सांगितले.

बारा महिने बाजारात मिळत असलेल्या झेंडूला गुढीपाडवा, दसऱ्याला भाव वाढतो. या अपेक्षेने आंबेगाव तालुक्यात   शेतकरी  झेंडू पीक घेतात. मात्र या वेळी बाजारभावाचे चित्र पालटले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ३० ते ४० रुपये प्रती किलो बाजारभाव होता. सध्या तोडणीचाही  खर्च निघत नाही. दरात फार वाढ होण्याची शक्यता नसल्याने अनेकांनी  फुलांची झाडे काढून टाकण्यास सुरवात केली आहे, असे विठ्ठल गेनभाऊ भोर यांनी सांगितले.

कोरोनाचे महाभयंकर संकट व लॉकडाउनमुळे बाजारपेठा बंद आहेत. दररोज दुकानदारांना देवपूजेसाठी लागणारा फुलांचा पुरवठा बंद झाला आहे. लग्न समारंभ, वाढदिवस, राजकीय पक्षांचे सार्वजनिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे पुष्पगुच्छ, हार भेट देण्याचे थांबले आहे. परिणामी फुलांना उठाव नाही.

मंचर, नारायणगाव भागात फुलांची विक्री करणारी लहान मोठी पंचवीस ते तीस दुकाने आहेत. लॉकडाऊनमुळे दुकाने बंद असून कारागीरही गावी निघून गेले आहेत. फुल विक्रेत्यांनाही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. दुकानाची मासिक भाडे,लाईट बिल ही त्यांना भरता येत नाही, असे मंचर येथील फुल विक्रेते रतन निघोट यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of farmers due to fall in flower prices