Fire at Serum Institute : एक हजार कोटींचे नुकसान : आदर पूनावाला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीच्या घटनेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ‘सीरम’चे अध्यक्ष सायरस पूनावाला आणि आदर पूनावाला यांनी आपली बाजू मांडली. आगीत नेमके कशाचे नुकसान झाले, त्याचे स्वरुप आणि त्याची किमत, याची उत्सुकता होती. संस्थेतील लशींचे उत्पादन, आगीची घटना, तिचे परिणाम, मृतांच्या कुटुंबियांना केलेली मदत याचा खुलासा आदर पूनावाला यांनी केला.

पुणे : आगीत नव्या इमारतीच्या तीन-चार मजल्यांवरील साहित्य जळाल्याने सुमारे एक हजाराहून अधिक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आदर पूनावाला यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. जगातील अन्य देशांना पुरविण्यात येणाऱ्या रोटा आणि बीसीजीच्या लशींसाठीच्या साहित्याचे नुकसान झाले आहे, हे त्यांनी नमूद केले. या घटनेमुळे ‘कोव्हिशिल्ड’ लशीचे उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी आर्वजून स्पष्ट केले.

सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीच्या घटनेची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ‘सीरम’चे अध्यक्ष सायरस पूनावाला आणि आदर पूनावाला यांनी आपली बाजू मांडली. आगीत नेमके कशाचे नुकसान झाले, त्याचे स्वरुप आणि त्याची किमत, याची उत्सुकता होती. संस्थेतील लशींचे उत्पादन, आगीची घटना, तिचे परिणाम, मृतांच्या कुटुंबियांना केलेली मदत याचा खुलासा आदर पूनावाला यांनी केला.

आणखी वाचा - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा इतिहास संकुचित ठेवणार का?

ते म्हणाले, ‘‘विविध देशांतील आजारांसाठी लशींचे उत्पादन करण्यासाठी या इमारतीचे काम करण्यात येत होते. मात्र, अद्याप उत्पादन सुरू झाले नव्हते. परंतु, त्याठिकाणी असलेले साहित्य जळाले आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. हे कामगार कंत्राटदाराचे होते. त्यामुळे त्यांची कोणतीही माहिती सीरमकडे नव्हती. त्यामुळे पहिल्यांदा मृत कामगारांची माहिती नव्हती. त्यामुळेच जीवितहानी झाली नसल्याचे ‘ट्विट’ केले होते. मात्र, जेव्हा मृतदेह सापडले; तेव्हा पहिले ट्विट मागे घेतले.’’

सायरस पूनावाला म्हणाले, ‘‘आग लागलेल्या इमारतीत कोणत्याही लशीचे उत्पादन सुरू झाले नव्हते. मात्र, अन्य इमारतीत ही घटना घडली असती; तर मोठे नुकसान झाले असते. ’’

आणखी वाचा - शनिवार वाड्याचा दिल्ली दरवाजा उघडला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loss of Rs 1 crore in Fire at Serum Institute said adar poonawalla