सापडलेले दिड लाखाचे दागिने परत करून घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन; विद्या रसाळ यांचे सर्वत्र कौतुक
TMB26B03847
टेंभुर्णी ः येथे विद्या संतोष रसाळ यांनी सापडलेले सोन्याचे दागिने ज्योती ज्ञानेश्वर डोके यांना प्रामाणिकपणे परत केले. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
सापडलेले दीड लाखांचे दागिने परत; विद्या रसाळ यांचा प्रामाणिकपणा
टेंभुर्णी, ता. २१ : हरवलेले दागिने पुन्हा मिळणे कठीण असते, ही सर्वसाधारण धारणा आहे. मात्र, टेंभुर्णीत घडलेल्या एका घटनेने प्रामाणिकपणा आणि माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय दिला आहे. विद्या संतोष रसाळ यांनी सुमारे दीड लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांचे पाकीट संबंधित महिलेला परत करून प्रामाणिकपणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
टेंभुर्णीतील ज्योती ज्ञानेश्वर डोके यांचे सोन्याचे मिनी गंठण, ब्रेसलेट व बिचवा असलेले ‘शीतल ज्वेलर्स’चे प्लास्टिक पाकीट ६ मार्च रोजी टेंभुर्णी पोलिस ठाण्यासमोरील शॉपिंग सेंटरमध्ये खरेदी करताना हरवले होते. त्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधाशोध केली, सीसीटीव्ही फुटेजही तपासले; मात्र दागिन्यांचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे त्यांनी दागिने मिळण्याची आशा सोडून दिली होती. विशेष म्हणजे हे गंठण त्यांच्या लग्नावेळी खरेदी केलेला एकमेव मौल्यवान दागिना होता.
दरम्यान, त्याच दिवशी विद्या संतोष रसाळ या देखील त्या दुकानात गेल्या असता त्यांना प्लास्टिक पाऊच सापडला. त्यामध्ये दागिने असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ दुकानदाराला माहिती दिली व योग्य ओळख पटल्यावरच ते परत करण्याचा निर्णय घेतला. नंतर ज्योती ज्ञानेश्वर डोके यांनी त्यांच्याशी संपर्क साधून पाकिटात असलेल्या दागिन्यांची माहिती दिली. खात्री झाल्यानंतर विद्या रसाळ यांनी त्यांच्या घरी जाऊन दागिने सन्मानपूर्वक परत केले. दागिने परत मिळाल्यानंतर ज्योती डोके भावूक झाल्या.
या प्रसंगी ‘शीतल ज्वेलर्स’चे मालक विजयकुमार कोठारी, उपकृषी अधिकारी अनिल कांबळे, शामल रसाळ, चव्हाणवाडीचे सरपंच हनुमंत चव्हाण, सतीश पोतदार, तसेच सिद्धेश्वर वणवे महाराज व वैशाली वणवे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

