'कोड टू लर्न, कोड फॉर फन' प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद

प्रविण खुंटे
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

पुणे :  प्रत्येक मुलामध्ये कल्पकता असतेच, गरज असते केवळ त्यांच्या कल्पनांना वाव देण्याची. मोबाईल अॅप वर तासंतास वेळ वाया घालवत यामुळे हैराण झालेले पालक आपण पाहिले आहेत.

पुणे :  प्रत्येक मुलामध्ये कल्पकता असतेच, गरज असते केवळ त्यांच्या कल्पनांना वाव देण्याची. मोबाईल अॅप वर तासंतास वेळ वाया घालवत यामुळे हैराण झालेले पालक आपण पाहिले आहेत. पण हिच मुलं या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जेव्हा स्वतः नविन अँप, वेबसाईट, इनोव्हेशन बनवतात तेव्हा....सारे कल्पनाशक्तीच्या पलीकडचे वाटू लागते. 'सकाळ' आणि प्रोग्रा मित्र तर्फे प्रायोजित  'कोड टू लर्न, कोड फॉर फन'  प्रदर्शनात अशाच अनेक 8 ते 14 वयोगटातील मुलांनी त्यांच्यातील कल्पनांच्या जोरावर इ कॉमर्स प्रोजेक्ट, ऑनलाईन शॉपिंग अँप, सुपर मार्केट बिलिंग अॅप, फळांपासून संगीत निर्मिती, रोबोट, मशीन अशा अनेक गोष्टी बनविल्या आहेत. 

सेनापती बापट रस्त्यावरील पत्रकार नगर मधील मुनोत सभागृहात हे प्रदर्शन सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू आहे. या प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक पालक आपल्या मुलांना घेऊन इथे आले आहेत. ज्या मुलांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे ती मुलं तितक्याच आत्मविश्वासाने त्याची माहिती देत आहेत.

८८ विद्यार्थी, ८ ते १४ वयोगट, १०० हुन अधिक प्रकल्प, ४५ शाळांचा सहभाग

''तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. त्याचा वापर करताना ते कसे चालते, बनवले जाते हे जेव्हा मुलं स्वतः बनवितात तेव्हा त्यांचा तंत्रज्ञानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.''
- निशिगंधा पळशीकर, संस्थापक प्रोग्रा मित्र

''तंत्रज्ञानाचे ज्ञान लहानपणापासून असणे आवश्यक झाले आहे. अशावेळी या प्रदर्शनाचे महत्त्व खूप आहे. यातून मुलांना आपल्या कल्पनांना वाव देण्याची संधी मिळते. अशा प्रकारचे हे पुण्यातील पहिलेच प्रदर्शन असावे.''
- स्वप्ना देशपांडे, दीप्ती विध्वंस, गीता नायर - पालक

''तंत्रज्ञान वापरून काहीतरी निर्माण करणे हे खडूच्या रंगांनी चित्र काढणे एवढं सोपं असलं पाहिजे. तर सगळी मुलं हे करू शकतील असा आमचा उद्देश आहे.''
- अमोल पळशीकर, संस्थापक प्लेझ्मो कंपनी.
 
''
आम्हाला या प्रदर्शनात येऊन नवीन कल्पना मांडायला मिळाली आम्ही हॅरी पोर्टर या विषयावर प्रश्नोत्तरे बनवले आहे.''
- प्रिशा पाचपोरे, इशिता सातपुते विद्यार्थिनी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A loud response to 'Code to learn, Code for Fun' exhibition