चासकमानमध्ये मागील वर्षी होता शंभर टक्के पाणीसाठा; आता मात्र...

low rainfall In Chaskaman dam area only 20.59 percent water is stored
low rainfall In Chaskaman dam area only 20.59 percent water is stored

खेड (पुणे) : चाससकमान धरण क्षेत्रात यावर्षी पाऊस कमी झाला आहे असून धरणात केवळ 20.59 टक्केच (1.56 टीएमसी) पाणीसाठा आहे. मागील वर्षी धरणात यावेळी शंभर टक्के पाणीसाठा होता. गेल्यावर्षी याचवेळी धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले होते. खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे नंदनवन करणाऱ्या चास-कमान धरण क्षेत्रात पाऊस नसल्याने चिंतेच वातावरण आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

मागील वर्षी धरणाचे पाचही दरवाजे उघडून भिमा नदीपात्रात विसर्ग सुरू होता, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षी धरणात ८० टक्के पाणीसाठा कमी आहे. खेड तालुक्यासह शिरूर तालुक्याचे संपूर्ण अर्थकारण ज्या धरणावर अवलंबून आहे त्या धरणाचा पाणीसाठा ऑगष्ट महिना सुरू झाला तरी चिंताजनक स्थितीत असून धरण क्षेत्रात पाऊसही रूसलेलाच आहे.

राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होत असून जवळपास सर्वच धरणे भरण्याच्या मार्गावर आहे व काही भरलेली असून धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. भिमाशंकर खोऱ्यात पावसाचे प्रमाण कमी असून या परिसरासह खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात पावसाचा जोर कमी असल्याने येथील भातशेती धोक्यात आली आहे. रिमझीम होत असलेल्या पावसाने सोयाबीन, भुईमुग, बटाटा व अन्य पिकांना जिवदान मिळाले असले तरी भाताच्या पिकासाठी हा पाऊस पुरेसा नाही. भातखाचरांमध्ये पाण्याअभावी भेगा पडलेल्या असून लागवडीवंतर पिकाची वाढच झालेली नाही. चास-कमान धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होण्यासाठी मुसळधार पावसाची गरज असून पावसाचा जोरच नसल्याने धरण भरणार की नाही हि चिंता प्रत्येक जिवाला भेडसावते आहे.

मागील वर्षी धरण परिसरात पावसाचे प्रमाण प्रचंड होते व धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात येवून धरणातून तब्बल पन्नास हजार क्युसेक्सने भिमा नदिपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरण परिसरात एक जुनपासून फक्त 400 मी. मी. पावसाची नोंद करण्यात आली असून धरणात येणारा पाणीसाठा ( आवक ) हा केवळ 4.79 द.ल.घ.मी. आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com