
पुणे : महिलांना रोजगार व महिला प्रवाशांसाठी सुरक्षित रस्ते प्रवासाचा पर्याय उपलब्ध होण्यासाठी ‘ई-पिंक रिक्षा’ योजना राबवली जात आहे. पुण्यासाठी पूर्वी १४०० रिक्षांचा कोटा होता, तो आता वाढवून २८०० केला आहे. मात्र त्या तुलनेत महिलांचा प्रतिसाद लाभत नाही. पुणे ‘आरटीओ’कडे रिक्षांची नोंदणी करण्यासाठी सातच महिलांचे अर्ज दाखल झाले.