आता एलपीजी सिलिंडर बुकिंग व्हॉट्सअ‍ॅपवर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 8 August 2020

बीपीसीएल कॉर्पोरेटचे डिजीटल संचालक अरुण सिंह यांनी ही माहिती दिली. राज्यासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने ग्राहकांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे : देशभरातील भारत गॅस एलपीजी ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा मिस्ड कॉल देऊन एलपीजी सिलिंडर बुक करू शकतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत पेट्रोलियमने देशभरातील सुमारे सात कोटींहून अधिक ग्राहकांना भारत गॅस सिलिंडर बुकिंग सुविधा सुरु केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बीपीसीएल कॉर्पोरेटचे डिजीटल संचालक अरुण सिंह यांनी ही माहिती दिली. राज्यासह देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मच्या मदतीने ग्राहकांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बीपीसीएल ग्राहकांना 6 हजार 111 मोठ्या वितरक नेटवर्कद्वारे सिलिंडरचे वितरण करते. ग्राहकांसोबत संवाद साधण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा अवलंब करण्यात येत आहे. भारत पेट्रोलियमला एलपीजी डिलीव्हरी ट्रॅकिंग, सुरक्षा जागरूकता निर्माण करणे आणि ग्राहकांचा अभिप्राय घेणे शक्य होणार आहे, असे सिंह यांनी सांगितले. 

राज्यात नवीन महाविद्यालयांना मान्यता; पदवी अभ्यासक्रमाच्या जागा वाढणार

कोंढवा बुद्रुक येथील अरिहंत गॅस एजन्सीचे भरत जैन म्हणाले, सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर गॅस सिलिंडर बुकिंग सुरु आहे. याशिवाय 7710955555 या अन्य क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यास सिलिंडर बुकिंगची सुविधाही लवकरच सुरू होणार आहे. 

रायगड जिल्हा परिषदेत कोरोनाचा धुडगूस; अँटिजेन तपासणीत इतक्या जणांना लागण झाल्याचे उघड 

व्हॉट्सअ‍ॅपवरून बुकिंगची प्रक्रिया -
भारत गॅस नोंदणीकृत मोबाईल 1800224344 क्रमांकावर 'बुक' किंवा '1' पाठवा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LPG cylinder booking on WhatsApp from Bharat Gas