

Thrilling Finish to Pune Grand Tour 2026; Luke Triumphs Overall
Sakal
पुणे: पुण्यात पाच दिवस सुरू असलेल्या ‘पुणे ग्रँड टूर २०२६’ सायकल स्पर्धेची सांगता शुक्रवारी (ता. २३) मोठ्या दिमाखात झाली. ली निंग स्टार संघाच्या ल्यूक मडग्वेने विजेतेपदावर मोहर उमटवली; तर सांघिक विजेतेपद ली निंग स्टार संघाने पटकावले. चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात श्नायर्को अॅलिक्सेई एक तास ५६ मिनिटे ५४ सेकंदांत ९५ किलोमीटरचे अंतर पार करत अव्वल आला.