Pune Grand Tour Competition : डोंगराळ मार्गावर ल्यूक चमकला; पुणे ग्रँड टूर स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

ऐतिहासिक, ग्रामीण आणि डोंगराळ भागांतून जाणारा हा आव्हानात्मक मार्ग असल्याने सायकलपटूंचा ताकद, तंत्र आणि सहनशक्तीचा कस लागला.
Luke madgway

Luke madgway

sakal

Updated on

पुणे - पुरंदर, राजगड आणि हवेली तालुक्यासह शहरी भागातून ‘पुणे ग्रँड टूर २०२६’चा दुसरा टप्पा बुधवारी (ता. २१) पूर्ण झाला. ऐतिहासिक, ग्रामीण आणि डोंगराळ भागांतून जाणारा हा आव्हानात्मक मार्ग असल्याने सायकलपटूंचा ताकद, तंत्र आणि सहनशक्तीचा कस लागला. सलग दुसऱ्या दिवशी चीनच्या ली निंग स्टार संघाचा ल्यूक मडग्वेने चमकदार कामगिरी करत सर्वोत्तम गुण मिळवले. त्याने दोन तास ३१ मिनिटे ४९ सेकंद वेळ नोंदवत यलो जर्सी पटकावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com