वेल्हे तालुक्यात लम्पीची लागण; प्रशासनाकडून खबरदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lumpy Skin Cattle

वेल्हे तालुक्यात लम्पी रोगाची लागण झालेला गुंजवणी धरणाजवळ धानेप गावात एक बैल आढळला.

वेल्हे तालुक्यात लम्पीची लागण; प्रशासनाकडून खबरदारी

वेल्हे, (पुणे) - वेल्हे तालुक्यात लम्पी रोगाची लागण झालेला गुंजवणी धरणाजवळ धानेप गावात एक बैल आढळला असून, लम्मी रोगाची लागण रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू असल्याची माहिती वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.

धानेप सह परिसातील विहीर, अंत्रोली, या गावांमधून आज शुक्रवारी (ता. १६) रोजी दोनशे जनावरांचे लसीकरण मोहीम सुरू केली असल्याची माहिती वेल्हे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. भास्कर धुमाळ यांनी दिली. यावेळी तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी पंकज शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, डॉ. के. के. खोरे, डॉ. संजय सोरटे, आदी उपस्थित होते.

डॉ. धुमाळ म्हणाले, धानेप येथील एका बैलाला लम्पीची लागण झाली असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागा मार्फत शेजारच्या भोर तालुक्यातुन दोनशे जनावरांचे डोस आज घेण्यात आले आहेत. गाई बैल अशा जनावरांना लम्पी रोगाची लागण होत असल्याने या जनावरांना लम्पी प्रतिबंधक लस शेजारील पाच किलोमीटर परिसरातील गावांमधून देण्यात येणार आहे.

लम्पीची लागण झालेल्या बैलाची प्रकृतीत उपचारा नंतर सुधारणा झाली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता जनावरांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन वेल्हे तालुका तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी धानेप व परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. अमोल नलावडे म्हणाले, लम्पीची साथ रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडे लसीची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Lumpy Skin Disease In Velhe Tahsil Caution From Administration

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..