
पुणे : राज्यात लम्पी या त्वचारोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत असून, आतापर्यंत बाधित झालेल्या १० हजार जनावरांपैकी ६ हजार ६१८ जनावरे बरी झाली आहेत, तर ९३ टक्क्यांहून अधिक गोवंशीय पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले आहे. प्रादुर्भाव असलेल्या भागात जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.