लाळ खुरकूत निर्मूलनासाठी लसीकरणावर भर

लाळ खुरकूत निर्मूलनासाठी लसीकरणावर भर
Published on

पुणे, ता. १२ : पशुधनामध्ये आढळणाऱ्या लाळ खुरकूतचे नियंत्रण व निर्मूलन करण्यासाठी राज्यात लसीकरणाची नववी फेरी गुरूवारी (ता. १३) सुरू होणार आहे. २९ सप्टेंबरपर्यंत ही मोहीम राबविण्यात येणार असून, यासाठी राज्यातील पशुवैद्यकीय संस्थांना ११९ लाख लसमात्रा आणि आवश्यक साधनसामग्रीचा पुरवठा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आला आहे.
लाळ खुरकूत हा गाई, म्हैस, शेळी व मेंढ्यांमध्ये आढळणारा विषाणूजन्य व संसर्गजन्य आजार आहे. या रोगामुळे पशुधनाची उत्पादकता घटते. दूध व अन्य पशुजन्य पदार्थांच्या उत्पादनावर परिणाम होतो. तसेच पशुजन्य उत्पादनांच्या निर्यातीवरही निर्बंध येत असल्याने पशुपालकांसह पशुपालनावर आधारित व्यवसायांचे आर्थिक नुकसान होते. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लाळ खुरकूत आणि सांसर्गिक गर्भपात या रोगांचे प्रतिबंधात्मक लसीकरणाद्वारे २०३० पर्यंत नियंत्रण व निर्मूलन करण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील नऊ राज्यांना लाळ खुरकूत मुक्त करण्याचे उद्दिष्ट केंद्राने निश्‍चित केले असून, त्यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

आठव्या फेरीत १५१ लाख पशुधनाचे लसीकरण...
राज्यात १३ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरणाची आठवी फेरी झाली. यात राज्यातील १५९ लाख गाय म्हैसवर्गीय पशुधनापैकी १५१ लाख पशुधनाचे लसीकरण झाले. मार्गदर्शक सूचनांनुसार पशुधनाचे दर सहा महिन्यांनी लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक असून, त्यानुसार नववी फेरी घेण्यात येत आहे.

स्थलांतरित, मोकाट पशूंनाही लस...
लसीकरण मोहिमेत पशूंच्या स्थलांतराच्या मार्गावरील पशुधन, गोशाळांमधील पशू आणि मोकाट पशूंचेही लसीकरण केले जाणार आहे. वन्य प्राण्यांमधून रोगाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन वनक्षेत्रालगतच्या गावांमधील पाळीव पशूंना प्राधान्याने लस देण्यात येणार आहे.

लाळ खुरकूत रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुपालकांनी गाई म्हैसवर्गीय पशुधनाचे लसीकरण वेळेत करून घेणे आवश्यक आहे. पशुधनाचे आरोग्य जपणे, उत्पादकता कायम ठेवणे आणि रोगामुळे होणारे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे लसीकरण गरजेचे आहे.
- डॉ. किरण पाटील, पशुसंवर्धन आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com