luxury bus car accident
sakal
शिरूर - चालकाचा ताबा सुटलेल्या आरामबसची पुढे चाललेल्या मोटारीला धडक बसली. त्यामुळे अनियंत्रीत झालेली ही बस त्याच वेगात पुढे चाललेल्या दुसऱ्या एका बसवर जावून आदळली. पुणे - अहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव गणपती (ता. शिरूर) जवळील खंडाळे माथा परिसरात शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या या अपघातात दोन्ही बससह मोटारीतील १६ प्रवासी जखमी झाले. अपघातानंतर तीनही वाहने रस्त्यातच आडवी - तिडवी झाल्याने ती हटवताना दोन तासांहून अधिक काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.