
Kharadi Water Issue
Sakal
वडगाव शेरी : खराडीतील गंगा रिट्रीट चोखी ढाणी परिसरात अनेक गगनचुंबी गृहप्रकल्प उभे आहेत, परंतु पुणे महापालिकेकडून पाण्याची कोणतीच योजना अस्तित्वात नसल्यामुळे या परिसरातील सोसायट्यांना पाण्यासाठी दर महिन्याला लाखो रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने या भागासाठी टाक्या बांधून आणि जलवाहिन्या टाकून पाणीपुरवठा योजना राबवावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.