

Admission
पुणे - औषधनिर्माणशास्त्राच्या पदव्युत्तर पदवी (एम. फार्मसी) आणि पदव्युत्तर फार्म.डी. अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत चौथ्या फेरीची निवड यादी जाहीर झाली आहे. यात चार हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. या फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांना येत्या शनिवारपर्यंत (ता. २४) प्रवेश निश्चित करता येणार आहेत.