Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

पुणे ग्रामीण पोलिसांची नारायणगावमध्ये धडक कारवाई, चौकशीसाठी ९० जण ताब्यात
Pune Crime News
Pune Crime NewsSakal

पुणे/नारायणगाव : महादेव बुक आणि लोटस ३६५ ॲपद्वारे ऑनलाइन सट्टाप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगाव येथील एका कॉल सेंटरवर बुधवारी छापा टाकला. या कॉल सेंटरमधील ९० जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कॉल सेंटर चालवणाऱ्या दोघांची नावे प्राथमिक तपासात समोर आल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गालगत नारायणगाव येथे मध्यवर्ती ठिकाणी चार मजली इमारत आहे. या इमारतीतील तीन मजले दोन महिन्यांपूर्वी नारायणगाव आणि जुन्नर येथील दोन प्रतिष्ठित व्यावसायिकांनी आयटी कंपनी सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावर घेतले होते.

मात्र, या ठिकाणी महादेव बुक आणि लोटस ३६५ या ॲपद्वारे ‘आयपीएल’ आणि इतर खेळांवर ऑनलाइन सट्टा खेळण्यात येत असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्या आधारे गुन्हे शाखा आणि खेड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने बुधवारी कॉल सेंटरवर छापा टाकला.

या कारवाईत मोबाईल, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. ऑनलाइन सट्टा प्रकरणात ही जिल्ह्यातील पहिलीच मोठी कारवाई आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली खेडचे पोलिस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महादेव ऑनलाइन बेटिंग प्रकरणी नारायणगाव येथील कॉल सेंटरवर बुधवारी कारवाई करण्यात आली. या कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. पंचनामा झाल्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

- पंकज देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

महादेव बेटिंग ॲपचे ‘नेटवर्क’

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात यापूर्वी ईडी आणि पोलिसांनी छत्तीसगड राज्य, नोएडासह अन्य काही शहरांत महादेव बेटिंग ॲपच्या कॉल सेंटरवर कारवाई केली आहे. या ॲपद्वारे कोट्यवधी रुपयांचा ऑनलाइन सट्टा खेळला जात होता. याचे ‘नेटवर्क’ दुबई, सिंगापूर, नेपाळ, मलेशिया, थायलंड आणि हाँगकाँगपर्यंत पसरल्याची माहिती तपासात समोर आली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com