Mahadev App : महादेव बेटिंग ॲप प्रकरण; पुण्यात ईडीची छापेमारी

मुंबई : ईडीने महादेव ॲप कंपनीची उपकंपनी असलेल्या लोटस 365 नावाच्या कंपनीशी संबंधित पुण्यातील ठिकाणांवर छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीकडून मंगळवारी आणि बुधवारी महादेव ॲपशी जोडलेल्या पॅनल ऑपरेटर्सची झडती घेण्यात आली.
Mahadev App
Mahadev Appesakal

मुंबई : ईडीने महादेव ॲप कंपनीची उपकंपनी असलेल्या लोटस 365 नावाच्या कंपनीशी संबंधित पुण्यातील ठिकाणांवर छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार, ईडीकडून मंगळवारी आणि बुधवारी महादेव ॲपशी जोडलेल्या पॅनल ऑपरेटर्सची झडती घेण्यात आली.

या कारवाईत अंदाजे 1.2 कोटी रुपये रोख, कागदपत्रे, युपीआई आयडी, अकाउंट बुक्स आणि बेटिंग आयडीशी संबंधित इतर डिजिटल पुरावे ईडीजे जप्त केले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पॅनेल ऑपरेटर आणि संबंधित सहयोगींचे जबाबही नोंदवले.

Mahadev App
IND VS ENG 5th Test : पहले आप.. पहले आप... अश्विन अन् कुलदीपमध्ये प्रेमळ खडाजंगी, अखेर वरिष्ठांचा मान ठेवलाच!

अलीकडेच, ईडीने भोपाळमधून हवाला ऑपरेटर गिरीश तलरेजा नावाच्या आरोपीला अटक केली. तलरेजा लोटस 365 कंपनीच्या प्रवर्तकांपैकी एक असून आरोपी सौरभ चंद्राकर, रवी उप्पल आणि सुभम सोनी यांचा जवळचा सहकारी होता.

तलरेजाच्या ईडीने केलेल्या चौकशीत प्रकरणाशी सबंधित धागेदोरे मिळाले आहे. तलरेजा महादेव ॲप कंपनीच्या ऑनलाइन बुकच्या सर्वोच्च स्थानावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आले आहे.

Mahadev App
Devendra Fadnavis : शरद पवारांच्या 'त्या' इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; म्हणाले, आमदाराला धमकी...

सोबतच त्याने अनेक शेल कंपन्या आणि हवाला ऑपरेटर्सच्या माध्यमातून सट्टेबाजीच्या निधीतून नफा ॲपच्या दुबई कार्यालयाच्या खात्यात वळवला. महादेव ॲपचे अनेक सहयोगी, प्रवर्तक आणि त्याच्या उपकंपनीच्या पॅनेल ऑपरेटर्ससह, सट्टेबाजीच्या पैशाची लाँड्रिंग करण्यासाठी तलरेजा यांच्या संपर्कात होते. आरोपी तलरेजाचा 500 कोटींहून अधिक रुपयांच्या व्यवहारात सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com