Youth Empowerment: युवकांनी स्वावलंबी होऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळा : महादेव जानकरांचा संदेश

शिक्षण, प्रामाणिकपणा, शिस्त व समाजसेवेच्या बळावर युवकांनी शेतीपूरक उद्योग, दुग्धव्यवसाय, आधुनिक शेती व डिजिटल तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याचे आवाहन
RSP founder Mahadev Jankar urged youngsters to become self-reliant by embracing agriculture-allied businesses, self-employment and modern farming opportunities.

RSP founder Mahadev Jankar urged youngsters to become self-reliant by embracing agriculture-allied businesses, self-employment and modern farming opportunities.

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : युवकांनी स्वावलंबी बनून शेतीपूरक व्यवसायाकडे विशेष लक्ष द्यावे. आपल्या गावाचा, समाजाचा आणि देशाचा विकास करण्यासाठी शिक्षण, प्रामाणिकपणा, शिस्त आणि समाजसेवा या चार गोष्टी प्रत्येक युवकाने अंगीकारल्या पाहिजेत. युवकांना स्पर्धा परीक्षा, स्वयंरोजगार, शेतीपूरक उद्योग, दुग्धव्यवसाय, आधुनिक शेती आणि डिजिटल तंत्रज्ञान यामध्येही मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी युवकांनी नवीन कौशल्ये आत्मसात करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, युवक ही भारताची शक्ती आहे असे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक व माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com