
शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात विविध राज्यांतील 2 हजार 843 मजूर काम करीत आहेत. अन्न-पाणी आदी सुविधा न मिळाल्यामुळे एकाही मजुराने लेबर कॅंप सोडलेला नाही. तर, गावाकडे जाण्याची ओढ लागल्यामुळे सुमारे 80 मजूर गेले आहेत, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.
पुणे : ''लेबर कॅंपमध्ये पुरेशा सुविधा मिळत नाहीत म्हणून आम्हाला गावाला जायचे, असे मजुर म्हणतात तर, पुरेशा सुविधा दिल्या जात असल्यामुळेच 99 टक्के मजूर लेबर कॅंपमध्येच आहेत'', असा दावा महामेट्रोने केला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शहर आणि पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात विविध राज्यांतील 2 हजार 843 मजूर काम करीत आहेत. अन्न-पाणी आदी सुविधा न मिळाल्यामुळे एकाही मजुराने लेबर कॅंप सोडलेला नाही. तर, गावाकडे जाण्याची आेढ लागल्यामुळे सुमारे 80 मजूर गेले आहेत, असे महामेट्रोने स्पष्ट केले आहे.
पुण्यात सिंहगड रस्त्यानं दाखवला संयम; रोखला कोरोनाचा राक्षस
महामेट्रोच्या कोथरूड येथील लेबर कॅंपमधील सुमारे 80 मजूर सोमवारी दुपारी झारखंडला जाण्यासाठी रवाना झाले. ''कंत्राटदाराने पुरेशा सुविधा दिल्या नाहीत,'' असे त्यांचे म्हणणे होते. या बाबत महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे म्हणाले, ''पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 10 लेबर कॅंप आहेत. त्यात 2843 मजूर राहतात. 25 मार्चपासून अगदी गेल्या आठवड्यापर्यंत काम बंद असतानाही सर्व मजुरांना त्यांची मजुरी देण्यात आली आहे. तसेच लेबर कॅंपमध्ये महामेट्रोकडून त्यांना अन्न-धान्य पुरविण्यात आले आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी, काळजी सातत्याने घेतली जाते. त्यासाठी डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून औषधेही दिली जातात. मजुरांना, त्यांच्या मुलांना मनोरंजनासाठी कॅरम, बुद्धीबळ, पत्ते आदी साधनेही दिली आहेत. त्यामुळे काल गेलेले 80 मजूर वगळता एकही मजूर गावी परत गेलेला नाही. आता कामेही सुरू झाले आहेत. त्यामुळे ते कामावर जाणे पसंत करीत आहेत.''
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
''मजुरांचा एक ग्रूप झारखंडचा होता. त्यांना गावी परत जायचे होते. त्यांच्या ठेकेदाराने ट्रेनसाठी त्या मजुरांची नोंदणी केली होती. परंतु, रेल्वे गाड्या सुरू झाल्याचे समजल्यावर ते परतण्यासाठी अधीर झाले. थांबण्यासाठी त्यांना महामेट्रोने जबरदस्ती केली नाही,'' असे सोनवणे यांनी सांगितले.
Coronavirus : ब्रिटनमध्ये वाढवला 'या' तारखेपर्यंत लॉकडाऊन
पुण्यात वनाज - रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या दोन मार्गांचे काम सध्या सुरू आहे. सुमारे 31 किलोमीटरचे हे मार्ग आहेत. 25 मार्चपासून लॉकडाऊनमुळे मेट्रोचेही काम बंद होते. परंतु, गेल्या आठवड्यातच केंद्र सरकारच्या सूचनांनुसार राज्य सरकारने पुणे आणि मुंबईतील मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार येथील दोन्ही शहरांत मेट्रोचे काम आता सुरू झाले आहे.
Coronavirus : हवेत फिजीशिअन, भूलतज्ज्ञ; मिळाले हाडांचे, डोळ्यांचे डॉक्टर