पुण्यात सिंहगड रस्त्यानं दाखवला संयम; रोखला कोरोनाचा राक्षस 

sinhagad road successful fight against coronavirus
sinhagad road successful fight against coronavirus

सिंहगड रस्ता (पुणे) Coronavirus : पुणे शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण सिंहगड रस्ता परिसरात आढळला असला तरी, मात्र येथील एकूण रुग्ण संख्या बारावरच स्थिरावली आहे. यात सर्वच घटकांनी संयम, शिस्त, जागरूकता दाखविल्याने मोठा अनर्थ टळला. अर्थात असे असले तरी मात्र, येणाऱ्या काळात अधिक सतर्कता दाखविणे गरजेचे आहे. नऊ मार्चला परदेश प्रवास केलेल्या कुटुंबातील लोकांना कोरोना झाल्याचे आढळले. त्यानंतर पुण्यासह सर्वत्र खळबळ उडाली. त्यावेळी त्या कुटुंबातील तिघांसह एकास कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. पाचवा रुग्ण 18 मार्चला आढळला. 16 एप्रिल ते 21 एप्रिल या सहा दिवसांत दिवसाला एक असे सहा रुग्ण आढळले. 

आठ लाखांहून अधिक नागरिकांचे वास्तव्य
पुण्यात सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 11 रुग्ण होते. त्यानंतर कोणताही रुग्ण आढळला नाही. तर एक मे रोजी आणखी एक रुग्ण आढळल्याने ती संख्या बारावर पोचली. नऊ मार्च रोजी पहिला तर एक मे रोजी 12 असे एकूण बारा रुग्ण आढळले. सिंहगड रस्ता परिसरात सुमारे आठ लाखाहून अधिक नागरिकांचे वास्तव्य आहे. यात दांडेकर पुलापासून ते थेट सिंहगडापर्यंतचे नागरिक येतात. परंतु महापालिकेचे नियोजन, पोलिसांचा चोख बंदोबस्त, स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य, सामाजिक संघटनांचा सहभाग आणि नागरिकांनी दाखविलेला संयमीपणा आणि शिस्त यामुळे येथील रुग्णांच्या संख्येत वाढ झाली नाही. पण, काल 11 मे रोजी परिसरात एक रुग्ण वाढला असून, अजून दोघांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

नियमांचे काटेकोर पालन
वस्ती भाग पिंजून काढून तेथे मोठ्या प्रमाणात र्निजंतुकीकरण आणि जनजागृती यामुळे कोरोना आटोक्यांत राहण्यास मदत झाली. बऱ्याच वेळा पोलिसी खाक्या दाखविल्याने शिस्त लावली गेली. सकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांना शिस्तीचा बडगा उचलला नंतर चित्र काही प्रमाणात बदलले.

पोलिस, संस्था संघटनांचे योगदान
नागरिकांच्या मदतीसाठी नगरसेवक श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप, शंकर पवार, राजू लायगुडे, नगरसेविका ज्योती गोसावी, मंजूषा नागपुरे, यांनी सहकार्य केले. सामाजिक संघटनांमधे समीर रूपदे, सचिन मोरे, राजू कदम, सचिन जामगे, गंगाधर भडावळे, युगंधर मित्र मंडळ, पोलिस मित्र संघटना, परिमंडळ वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पखाले, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन वीर आणि त्यांचे सर्व सहकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकिशोर शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश उमरे या सगळ्यांचाच सहभाग महत्त्वाचा ठरला. पोलिसांनी रस्त्यांचे नियोजन काटेकोरपणे केले. कोणत्याही भागात जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकच रस्ता खुला ठेवल्याने नियंत्रण ठेवणे सोपे झाले.

या सगळ्यात महत्त्वाचा दुवा ठरले ते डॉक्टर त्यांच्या सहकार्यामुळे याभागात कोरोनाचा शिरकाव तर झाला. मात्र, तो पसरला नाही. स्थानिक सर्वच डॉक्टर आणि महापालिका प्रशासनातील डॉक्टगरांच्या सहकार्याने रुग्ण सेवा शुश्रूषा झाली. ज्या भागात रुग्ण आढळले त्यानंतर तेथे भारतीय जनता संस्था सामाजिक संस्थेच्या सहकार्याने डॉ. आशा शेळके यांच्या मदतीने परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामुळे निदान करणे सोपे झाले. रुग्ण संख्या आटोक्याकत राहण्यास मदत झाली.

विविध सोसायट्यांसह संपूर्ण प्रभागात जंतुनाशक फवारणी, गरजू नागरिक, ऑर्केस्टा कलाकार, परराज्यातील नागरिक यांना जीवनावश्यंक वस्तूंचे वाटप केले. विविध ठिकाणी हात धुण्यासाठी यंत्र बसविले. किराणा दुकानांचे नियोजन, महिला बचत गटाच्या माध्यमातून मास्कची निर्मिती आणि वाटप, मास्क डिस्पोजेबल करण्यासाठी यंत्रणा राबविण्याचे काम सुरू आहे.
- श्रीकांत जगताप, नगरसेवक

पोलिसांसोबत जनजागृती सह विविध कामात सक्रिय सहभाग घेत सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोज, खाद्यपदार्थ, पाण्याचा बाटल्या, चहा, नाश्ता, आदींचे वाटप केले. नागरिकांना पोस्टाच्या माध्यमातून रोख पैसे उपलब्ध करून दिले.
- समीरू रूपदे, आपुलकी पुणे, सामाजिक संस्था

पहिल्या पासूनच गावात येणारे रस्ते बंद केले. गावात दोनच ठिकाणी प्रवेशद्वार खुले ठेवले. तेथे चेकपोस्ट तयार करून तेथे तीन शिफ्ट मधे कर्मचारी नियुक्ती केले. तपासणी करूनच गावात प्रवेश दिला जातो.
- बाळासाहेब गावडे, ग्रामविकास अधिकारी, नऱ्हे ग्रामपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com