स्थानिकांना ‘महामेट्रो’त प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

पुणे - शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पात काम करणारे ६० टक्के कर्मचारी मराठी आहेत. प्रकल्पाच्या कामासाठी मनुष्यबळ नियुक्त करताना स्थानिक आणि मराठी व्यक्तींना प्राधान्य द्यावे, असे आदेश संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत, असे महामेट्रोने एका पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. 

मेट्रो प्रकल्पात मनुष्यबळ नियुक्त करताना मराठी आणि स्थानिक व्यक्तींना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी महामेट्रोच्या कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. त्याची दखल घेऊन महामेट्रोने शिंदे यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की महामेट्रो हा केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. 

या प्रकल्पात वरिष्ठ पदांवर तज्ज्ञ आणि अनुभवी अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या केल्या आहेत. मात्र पर्यवेक्षकीय स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या करताना त्यांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्‍यक आहे. अपर्यवेक्षकीय पदांसाठी उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे, त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आणि मराठी वाचता, लिहिता येणे आवश्‍यक आहे. महामेट्रोमध्ये १६० अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यापैकी ६० टक्के कर्मचारी मराठी आहेत. अपर्यवेक्षकीय कर्मचारी आवश्‍यकतेनुसार स्थानिक एजन्सीमार्फत पुरविण्यात येत असून, त्यातही ७० टक्के कर्मचारी हे मराठी भाषिक आहेत.’’ महामेट्रोचे महाव्यवस्थापक (एचआर) डॉ. हेमंत सोनावणे यांनी हे पत्र शिंदे यांना पाठविले आहे.

Web Title: Mahametro Labour Work Marathi People