Maharashtra Government : कृषी अधिकाऱ्यांचे 'हेलपाटे' वाचणार! १३ हजार २७५ कर्मचाऱ्यांच्या हातात लवकरच लॅपटॉप येणार, शासनाचा निर्णय
Laptops Approved for Agriculture Officers : कृषी अधिकाऱ्यांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांची ऑनलाइन कामे ठिकाणाहूनच करता यावीत यासाठी, महाराष्ट्र शासनाने राज्यातील १३ हजार २७५ कृषी कर्मचाऱ्यांना लॅपटॉप देण्यासाठी निधी मंजूर करत अखेर निर्णय घेतला आहे.
पुणे : कृषी अधिकाऱ्यांच्या कामात सुसूत्रता येण्यासाठी व बहुतांश योजना ऑनलाइन असल्याने शासनाने लॅपटॉप देण्याचे ठरविले होते. या लॅपटॉप खरेदीला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता कृषी अधिकाऱ्यांच्या हातात लॅपटॉप येणार आहे.