बाळासाहेब मालुसरे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

बाळासाहेब मालुसरे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी निवड

कँटोन्मेंट : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत आप्प्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाख़ाली व अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष रणजीत जागताप यांच्या हस्ते शिवसेना उपशहर प्रमुख आणि मंडई विद्यापीठ कट्टाचे अध्यक्ष बाळासाहेब मालुसरे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी बाळासाहेब मालुसरे यांनी सांगितले की संघटना वाढवण्यासाठी दिवसरात्र एक करणार आहे. तसेच मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात जास्तीत जास्त न्याय मिळावा यासाठी काम करणार आहे.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार, बहुजन महाआघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अर्चना शहा भिवरे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष रणजित जगताप , युवक प्रदेश संघटक महाराष्ट्र करणसिंह मोहिते हंबिरराव , बयुवक अध्यक्ष पिंपरी चिंचवड, बाबासाहेब शिंदे, युवक अध्यक्ष पुणे शहर मयुरेश प्रताप पाटील, प्रीतम इंदलकर, धनाजी शिंदे, स्वप्नील जाधव, हर्षद मालुसरे, गणी पटेल आदी उपस्थित होते.