
पुणे : राज्यातील जमीन मोजणी गतिमान करण्याबरोबरच अचूक करण्यासाठी आणि प्रलंबित मोजणी प्रकरणे निकाली काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाला एक हजार २०० नवीन रोव्हर मशिन खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे रोव्हर मशिनची संख्या जवळपास तीन हजारांपर्यंत जाणार आहे.